Share

ग्रंथ परिक्षण : शेवाळे प्रकाश कारभारी, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालय, पंचवटी नाशिक.
लांबा उगवे आगरीं” – एका प्रकाशयात्रीची जीवनकथा
“लांबा उगवे आगरीं” हे डॉ. म. सु. पाटील या मराठीतील ख्यातनाम समीक्षकाचे आत्मचरित्र ग्रंथाली प्रकाशनाने डिसेंबर २०१४ मध्ये प्रकाशित केले आहे. डॉ. म. सु. पाटील यांनी अतिशय प्रांजळपणे आपल्या जीवनात घडून गेलेल्या गोष्ठी आठवणींच्या रूपाने या आत्मचरित्रात मांडल्या आहेत. मराठी साहित्य आणि समीक्षा या विषयावरील डॉ. म. सु. पाटील यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तुकाराम – अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे, दलित कविता व दलितसाहित्याचे सौंदर्यशास्त्र, प्रभाकर पाध्ये : वाड्मयदर्शन (संपादित, सहलेखक – गंगाधर पाटील), सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध, ज्ञानेश्वरीचा काव्यबंध, ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध, बालकवींचे काव्यविश्व, भारतीयांचा साहित्यविचार, आदिबंधात्मक समीक्षा, इंदिरा यांचे काव्यविश्व, साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध,कविताच रुपशोध या अतिशय महत्वाच्या पुस्तकांमधून व महाराष्ट्रातील साहित्य व समीक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या समजल्या जाणार्या सर्वच नियतकालिकातून समीक्षेची नवी रूपे म. सु.पाटील यांनी मांडली आहेत. तरीसुद्धा म. सु. पाटील यांची खरी ओळख मात्र आपणास त्यांच्या “लांबा उगवे आगरीं” या आत्मचरित्रातून होते. ज्ञानेश्वरी च्या सहाव्या अध्यायात योगभ्रष्टाच्या वर्णनात ज्ञानदेवांनी ४४४ व्या ओवीत असे म्हटले आहे कि, पाठीं जन्में संसारीं । परि सकळ धर्माचिया माहेरीं । लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचा ॥ ४४४ ॥ म. सु. पाटील यांनी वर्णन केलेला हाच लांबाहोय. ही कणसे नव्या पेरणीच्या भाताअगोदर तयार होतात. लांबा जसा वेळेच्या आधीच परिपक्व होतो,तसेच परिस्थितीने अकालीच लादलेल्या परिपक्वतेनंजगण्याला उत्कटतेन भिडलेल्या म. सु. पाटील याचं हे निर्मळ आत्मचरित्र, आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षणपण आहे. डॉ. म. सु. पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकर्‍याच्या कुटुंबात झाला. शहाबाज हे मुख्य गाव असलं तरी पाच पाड्यात विभागलेल्या या गावातील धामणपाडा हा एक पाडा म्हणजे डॉ. म. सु. पाटील यांचे गाव. गावातील शेतीत फक्त भात पिकायचा. बाकी सगळ्या जमिनीत दुसरं काहीही उगवत नाही. ह्या शहाबाजच्या पाच पाड्यांपैकी चार पाड्यांवर आगरी समाजाची लोकवस्ती आहे. आगर पिकवणारे ते आगरी.जमीन अत्यल्प वाट्याला आलेली असल्यामुळे डॉ. म. सु. पाटील यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फार जिकिरीची म्हणजे बेताचीच होती होती. स्वताच्या गावात राजकारण जोरात असूनसुद्धा म्हणजेच दोन पार्ट्या असून सार गाव वेळेला एक होणारं आहे. कोकणातली घरे, कोकणातले राजकारण तेथील कांग्रेस व स्वतंत्र मजूर पक्ष याच्या सर्व आठवणी या ग्रंथात येतात. अनेक पाड्यांची गावं, अशा गावात शिक्षणाबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा होणारा विकास,गावात मिळणारे अनौपचारिक शिक्षण आणि यातूनच म. सु. पाटील यांचा पोसला गेलेला सांस्कृतिक पिंड महत्वाचा वाटतो. कृष्ण जन्मोत्सव, गोपाळकाला, होळी, हनुमान जयंती व गणपती असे धार्मिक कार्यक्रम या गावात अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असत. नाटके गावात सादर करतांना सर्व मुले वेगवेगळी कामे वाटून घेतात आणि यातूनच खर्या अर्थाने नेतृत्वगुण, अभिनय व सभाधीटपणा असे गुण विकसित होतांना दिसतात. या काळात करमणुकीची साधने अल्प असली तरी गावात येणारे वेगवेगळे भिक्षेकरीहि ज्ञानाची शिदोरी देऊन जात. नंदीबैलवाला, पोतराज, गोंधळी, गारुडी,फकीर हे आपल्याबरोबर वेगवेगळी संस्कृती घेऊन गावोगाव फिरतांना गावात येउन जणूकाही अनौपचारिक शिक्षणाचे कामच करायचे. हे सर्व भिकारी नव्हते वा नुसते भिक्षेकरी नव्हते तर लोकसंस्कृतीचे उपासक होते. त्यांच्यामुळेच या खारेपाटातल्या पाड्यांना जीवंतपणअसायचे. डॉ. म. सु. पाटील हे घरात सर्वात मोठे असल्यामुळे त्यांचे सुरुवातीला लाड झाले पण प्राप्त परिस्थितीला अनुसरून दारिद्र्याचे चटकेही त्यांनाबसलेत. कपडेसुद्धा मनाप्रमाणे त्यांना स्वतः कष्ट केल्याशिवाय मिळाले नाहीत. सुरुवातीला शेवटच्या रांगेत बसवलेला मधु काही दिवसातच पहिल्या नंबरला येउन बसला आणि येथूनच त्यांची खरी यशाची घौडदौड सुरु झाली. म. सु. पाटील यांच्या लहानपणी त्यांनाग्रांथिक मराठी प्रमाणभाषेचा अभ्यास करण्याची साधने नव्हती.प्राप्त परिस्थितीवर मत करत अत्यंत गरिबीत कष्ट करून ते त्या वेळच्या व्हर्नाक्युलर फायनलच्या परीक्षेत कुलाबा जिल्ह्यातून मधू पाटील पहिल्याक्रमांकाने उत्तीर्ण झाले. या काळात त्यांना नीळूशेट, मारुतीशेट व शिवाजीदादा या गावकऱ्यांनी फार मोठा आधार दिला. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी पाटील मुंबईला आले. वडील वरळी कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्यानिचर्‍यासाठी मोरी अशा गोष्टींची सोय नसलेल्या झोपडीसदृश घरात ते त्या वेळी राहत असत.वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेहीसर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले. शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे मालेगाव येथील मसगा महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर मनमाडमहाविद्यालयात प्राध्यापक व प्राचार्य झाले. वयाची एकूण तीस वर्ष म. सु. पाटील यांची उत्तर महाराष्ट्रात गेलेली. या मातीशी अनेक आठवणी त्यांच्या जोडल्या गेल्या त्या त्यांनी इथे उलगडल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काम करून आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम म. सु. पाटील यांनी केले. प्राध्यापक व प्राचार्य असतांना अध्ययन वा तासाची पूर्ण तयारी केल्याशिवाय ते कधीच वर्गावर शिकवण्यासाठी गेले नाही. म्हणूनच आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आजही टिकून आहे. म. सु. पाटील यांनी मराठी साहित्य व समीक्षेच्या क्षेत्रात अतिशय भरीव योगदान दिले असून मराठी साहित्य वसमीक्षा समृद्ध करण्याचे काम केले आहे. समीक्षेतील पौर्वात्य व पाश्चिमात्य नव्या संकल्पनांचे मराठी साहित्य समीक्षेत त्यांनी उपयोजन केले. आदिबंधात्मक समीक्षा,मनोविश्लेषणात्मक समीक्षा, आधुनिकता व उत्तरआधुनिकतावाद, चिन्हमिमांसा, सौंदर्यानुभव अशा अनेक संकल्पना मराठीत आणल्यामुळे तसेच याच काळात गंगाधर पाटील, एम. पी. पाटील व पुरुषोत्तम पाटील यांचेही मराठी साहित्य व समीक्षेत दबदबा असल्याने मराठी साहित्य समीक्षेत पाटलांचे युग म्हणून हा काळउल्लेखिलेला गेला आहे. अनुष्टुभ सारखे नियतकालिक रमेश वरखेडे यांनी सुरु केले ते डॉ. म. सु. पाटील यांच्या सल्ल्यानेच. अधिदेशक तसेच संपादक म्हणून डॉ. म. सु. पाटील यांनी अनुष्टुभचे काम पहिले. अनुष्टुभ या नावाने शेवटचा अंक जानेवारी २००५ ला निघाला त्या शेवटच्या अंकापर्यंतची प्रुफे पाटील यांनी तपासलीत. पुण्या मुंबईपासून दूर एका खेड्यात एक साहित्याची चळवळ निर्माण करून तिथला भूभाग हा सांस्कृतिकदृष्ट्या सुजलाम करून टाकण्याचे काम त्यांनी केले आहे. डॉ.म. सु. पाटील हे साहित्यातले परिस असून ज्यांना ज्यांना ह्या परिसाचा ज्ञानात्मक स्पर्श झाला त्यांच्या आयुष्याचे सोने झाले आहे. मालेगाव व मनमाड या गावांना नोकरी करतांना कुटुंबापासून दूर असल्यामुळे आपल्या जीवाची होणारी घालमेल अतिशय सूचकतेने मांडली आहे. पत्नीने आयुष्यभर त्यांच्या सर्व निर्णयांना दिलेली समंती त्यांना साहित्यिक प्रगती करतांना उपयोगी आली. चारही समंजस मुली व जावई या सर्वांचा वाटा त्यांच्या जीवनात अतिशय महत्वाचा आहे. हे सर्व असतांना त्यांना दुखावणार कोणीच नाही असे नाही पण त्यांनी अतिशय प्रांजळपणे ह्या सर्व गोष्टी मांडल्या आहेत. सरळमार्गी माणसाला काही कपटी माणसांचे स्वभाव लक्षात येत नाहीत हे त्यांनी सांगितले असून त्यांनी ज्यांनी त्यांनात्रास दिला त्यावेळेला त्यांची मनस्थिती तसेच त्यांचा स्वभाव असा असण्याची काही करणे सांगतानाच त्या व्यक्तींना अजिबात दोष दिलेला नाही हे फार मोठे विशेष आहे. माणसांचे कुटुंबातील लोकांनी पत्नीची केलेली उत्तरक्रिया, कर्म महत्वाचे मानणारे पाटील हे विज्ञानवादी होते म्हणून त्या काळात त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. मुलगी हाच खरा वंशाचा दिवा आहे, कुठलाही विधी न करणे सत्यनारायनाच्या पूजेला न बसणे,परिस्थिती माणसाला कशी घडवत जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे. हे आत्मचरित्र साहित्य क्षेत्रातील बुद्धीजीवी लोकांची बौद्धिक भूक भागविणारे आणि इतिहासाची पाने उलटून दाखविताना विसाव्याशतकातील उत्तरार्धात साहित्याविषयी सखोल चर्चा करीत वाचकाला समृद्ध करणारे आहे. म. सु. पाटील यांनी जीवनप्रवासाबरोबरच मराठी साहित्य, समीक्षा व अनुष्टुभ नियतकालिकाची जडणघडण याबाबतीत अतिशय महत्वाचा दस्ताऐवज यानिमित्ताने खुला केला आहे. म. सु. पाटील यांनी आदिबंधात्मक समीक्षा तसेच त्यामुळे ते केवळ आत्मचरित्र नाही तर तो एक संदर्भग्रंथ आहे, सर्वात शेवटी डॉ. म. सु. पाटील यांनी एम. पी. पाटील, पुरुषोत्तम पाटील, प्रभाकर बागले हे मित्र, गो. तु. पाटील, रमेश वरखेडे, प्रतिभा कणेकर हे विद्यार्थी तसेच रामजी बैकर, ओगले मास्तर, ज. क. पाटील, रावसर हे शिक्षक व डॉ. म. सु. पाटील यांच्या लेखनाची निगा ठेवणारे दिनकर गांगल, संजय भास्कर जोशी, रविमुकुल, सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी आणि शकुंतला मुळ्ये तसेच अस्मिता, नीरजा, अनुराधा, तृप्ती या मुली आणि जयप्रकाश, राजन, अनुराधा, शंकर या जावई या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.सर्वसाधारणपणे आत्मचरित्र म्हटले की, त्यात भानगडींविषयी काही आहे का, याची चाचपणी होते. तसेच सर्वसाधारणपणे आत्मचरित्रांमध्ये आत्मप्रौढी, मी कसा मोठा झालो, कसा इतरांना उपयोगी पडलो, मला जगाने कसा त्रास दिला याची मिजास आपल्याला पानोपानी जाणवते. पण पाटील यांचे आत्मचरित्र तसे नाही. पाटील यांनी आपला हा प्रवास तटस्थपणे उलगडतानाच या प्रवासात भेटलेल्या चांगल्या व्यक्तींविषयी कृतज्ञतापूर्वक लिहिले आहे. म्हणून ते अत्यंत वेगळे आणि वाचनीय आहे. माणसाचा स्वभाव हा दुसऱ्यांच्या घरात डोकावणारा असतो. तसेच काहीसेआत्मचरित्राविषयी असते. मात्र बरीचशी आत्मचरित्रे ही केवळ कृतज्ञता आणि कृतार्थता या दोन भावनांतून शब्दबद्ध झालेली असतात. काही आत्मचरीत्रांमध्येदुसर्यावर टीका व स्वत मात्र खूप चांगला असा भाव असतो पण हे आत्मचरित्र वाचकांना अनुभवसमृद्ध करणारे आहे.

Recommended Posts

The Undying Light

jkrcbr
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

jkrcbr
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More