सदगुणांचे पाईक: समर्पित प्रकाशयात्री (पुस्तक परीक्षण)
समर्पित प्रकाशयात्री हे सेवाव्रती लेखक सुखदेव सुकळे यांचे चरित्रात्मक लेखन होय. त्यांच्याकडून भेट म्हणून मिळालेले हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे तीन दिग्गज कर्मयोगी यांचे चरित्र लेखन. ही तिनही व्यक्तिमत्व आकाशाएवढ्या उंचीची आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती स्वतंत्रपणे पुस्तकाचे लेखन करता येईल; परंतु लेखक सुखदेव सुकळे यांना ही व्यक्तिमत्व जशी भावली तशी अल्पशब्दात मांडली आहेत. हे पुस्तक महादेव मळा या तीर्थक्षेत्राचे दैवत स्व. ॲड.रावसाहेब शिंदे यांना समर्पित केलेले आहे. या पुस्तकातील ग्रामीण साहित्यिक स्व. नामदेवराव देसाई व डॉ. राजीव शिंदे यांच्या प्रेरणादायी शुभेच्छा लेखनासाठी बळ देतात. या चरित्र लेखनात कर्मयोगी प्राचार्य टी. ई. शेळके, साहित्यप्रेमी डॉ. बाबुराव उपाध्ये आणि आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा आहे. चरित्र लेखनासाठी लेखकांनी केलेल्या या दिग्गजांची निवड सार्थ ठरावी अशीच आहे. समाजाप्रती समर्पित भावनेने ती आजही आपापल्या कार्यक्षेत्रात अखंडपणे कार्यरत आहेत. ज्ञान, सत्य, साहित्य, प्रबोधन आणि सेवा या प्रकाशाच्या शोधात पूर्ण निष्ठेने, चिकाटीने आणि एकाग्रतेने प्रवास करणारी ही प्रकाशयात्री आहेत. सतत सकारात्मक, नैतिक आणि मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केलेली ही व्यक्तिमत्व आहेत. अशाच व्यक्ती स्वकर्तृत्वातून, विचारातून आणि सेवाभावनेतून समाजात प्रकाश पसरवतात. त्यामुळे खऱ्याअर्थाने ते प्रकाशाचे प्रवासी ठरतात. अंधारावर मात करून उजेडाच्या दिशेने केलेला प्रवास हा या व्यक्तींच्या जीवनाचा मूलाधार आहे. समाजात आपल्या ज्ञान, विचार, भावना, सेवा, कौशल्याच्या माध्यमातून समाजाला प्रकाशमान करणाऱ्या व्यक्तींच्यावर लेखकांनी टाकलेला प्रकाश निश्चितच सुयोग्यतेचा वाटतो.
प्रेम योगावर करावे, प्रेम भोगावर करावे, पण सर्वाहून अधिक प्रेम त्यागावर करावे, या कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती ज्यांच्या कार्याविषयी तंतोतंत लागू पडतात, असे व्यक्तिमत्व म्हणजे कर्मयोगी प्राचार्य टी. ई. शेळके होय. जीवनाचे खरे वैभव स्वच्छ निर्मळ आणि नीतिमान जगण्यात असते. समाजात संस्कार आणि संस्कृती जागविण्यासाठी आपल्याजवळील विचारांचे धन जे नव्या पिढीला देत आहेत. अशा कर्मयोगीचे कार्य दीपस्तंभसारखे आहे. शांतपणाची फलश्रुती प्रार्थनेतून होते, प्रार्थनेतून फलश्रुती श्रद्धेत होते, श्रद्धेतून प्रेम निर्माण होते आणि प्रेमातून साकारते सेवा. ही सेवा आणि विचारधारानेच समाजतृप्त होतो. प्राचार्य शेळके सरांनी जीवनात नेहमीच कर्मपूजा महत्त्वाची मानली. म्हणून खऱ्याअर्थाने ते कर्मपूजक आहेत. कोणत्याही फळाच्या मोहात न अडकता केवळ कर्तव्य म्हणून समर्पित भावनेने केलेल्या कार्याचा उल्लेख लेखकांच्या लेखनकार्यातून येतो. कर्मयोगी जो असतो, ज्याचे कर्म निष्काम असते, त्याचा स्वकर्तव्यभाव जागृत असतो, ज्याची समत्वबुद्धी स्थितप्रज्ञ असते, समर्पणभाव, निष्ठा आणि नैतिकता या वृत्ती ज्यांच्या ठायी असतात, तो खरा कर्मयोगी. लेखकांना असा कर्मयोग आणि ज्ञानयोग शेळके सरांमध्ये दिसला. सानेगुरुजींची विचारसरणी लाभलेल्या शेळके सरांच्या जीवनाची वाटचाल ही समर्पित वाटचाल आहे. त्यांनी त्याग आणि सेवेतून जोडलेली माणसे हीच त्यांची संपत्ती आहे. हे शेळके सरांविषयीचे मूल्यविचारांचे धन लेखकाने आपल्या लेखणीतून समर्पकपणे मांडलेले आहे.
समाजप्रबोधनाची मशाल हाती घेऊन जे प्रबोधनाचे काम अत्यंत निष्ठेने आणि मनोभावे करत आहेत, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे साहित्यप्रेमी डॉ. बाबुराव उपाध्ये होय. ज्यांनी आजअखेर शुद्ध चारित्र्य, निस्सीम त्यागभाव, सेवाभावी वृत्ती आणि जराही अहंभाव न बाळगता सतत समाज आणि साहित्याची निष्ठेने सेवा व उपासना केली, असे उपाध्ये सरांचे साहित्य क्षेत्रातले कार्यकर्तृत्व गगनभेदी आहे. उपाध्ये सरांनी आपल्या जीवनात नेहमीच स्त्रीमनाचा आणि स्त्रीसन्मानाचा आदर्श जपलेला आहे. त्यांची विद्यार्थी दशेपासूनची साहित्यसेवा, समाज घडविणारे शिक्षण, माणूस घडविणारे शिक्षण, दादा पाटलांचे आशीर्वाद, रावसाहेबांचे प्रबोधन, कमवा व शिका योजनेतील योगदान, पहिली नोकरी, शिक्षणासाठीचा आधार, साहित्य निर्मितीतील योगदान, प्राचार्य मंडळींशी सौख्यभाव, वसतिगृहातील निवास व स्वालंबन, आईचे संस्कार, संस्कारशील शिक्षक, समाजासाठीचे योगदान यातून उपाध्ये सरांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकलेला आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून भरकटलेल्या समाजव्यवस्थेच्या डोळ्यात घातलेले अंजन म्हणजे उपाध्ये सरांचा लेखनप्रपंच होय. साहित्य आणि संशोधन क्षेत्रातले त्यांचे लेखन नव्या पिढीला प्रेरक व आदर्शवत शेतीची आहे. त्यांच्या सामाजिक जाणिवेतून पोटतिडकीने समाजवास्तवाचे भान ठेवून व्यक्त झालेले हे लेखन हृदयस्पर्शी आहे. असे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या लेखनाचा हा प्रवास दवबिंदूंच्या स्पटिकाप्रमाणे चकाकणारा आहे.
ज्यांना जीवन आणि सेवा कळली. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन जीवन फुलण्यासाठी कष्ट उपसले. दुःखितांच्या जीवनात ज्यांनी सुख पेरले, असे समर्पित प्रकाशयात्री म्हणजे आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड होय. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी सेवाभावी वृत्तीने परिश्रम घेतलेले आहे. गरिबांच्या कणवेने त्यांचे अंतकरण नेहमीच भरून येते. सेवाव्रत पाळून ज्यांनी आयुष्य व्यतीत केले. अशा व्यक्तिमत्त्वाच्या सेवाकार्यावर लेखकांनी टाकलेला प्रकाशझोत वाचकांच्या मनाला भावणारा आहे.
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, या ओळीतून त्यांना रावसाहेबांच्या कार्याची प्रचिती येते. म्हणून रावसाहेबांविषयीच्या कृतज्ञताभावाने लेखकांचे मन भरून येते. दोघा उभयतांचे छायाचित्र आणि आशय वाचकांना प्रेरित करणारा आहे. मुखपृष्ठावरील रावसाहेबांसह चरित्रमूर्तींची छायाचित्रे अधिकच बोलकी आहेत. मलपृष्ठावरील लेखकांचा संदेश संस्करणीय आहे. लेखकांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्यावतीने हे पुस्तक प्रकाशित केले असून मुद्रक प्रकाश ऑफसेट, पुणे हे आहेत. व्ही. डी. वेलणकर, राहुल वेलणकर यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ उत्कृष्टपणे तयार करून पुस्तक आकाराला आणले. तेजश्री वाडणकर यांनी अक्षरजुळणी केली तर प्रा. योगीराज चंद्रात्रे यांनी पुस्तकाचे सेटिंग केले. सर्वांना शुभेच्छा तसेच पुस्तकालाही शुभेच्छा.
डॉ. शरद दुधाट