Share

आई असते तेव्हा तिची किंमत कळत नाही कधी समजून घेतलं का तिला एक कविता
आईसाठी आज स्वतःला जाब विचारा आईसाठी आपण काय करतो . त्याचा आढावा
घ्यावा .आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडलंय ….आपण
जेवायच्या आधी आईस ताट करती वाढले बरं ..तुम्ही घरी येताना आईसाठी कधी
काय आणलं बरं ..तुम्ही सांगा तुमच्या आईचा आवडता रंग कोणता ?आईला हवं ते
मिळू दे अशी कधी प्रार्थना केलीये? आई करते आपण करत नाही .पाहिले का कधी
आई शेवटची ऑनलाईन कधी आली. तिच्या वाढदिवसाची पार्टी तिच्या मैत्रिणींना
बोलून देतो हे सगळं तीच करते. तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो का ?
तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन भरून येतं. पण आपण मात्र बोलताना
शिव्या आई वरूनच देतो. लक्ष ठेवून ती नेहमी आपल्या बाळासाठी हात पसरते
..कधी देवापुढे तर कधी नशिबापुढे . तर माझ्या बाळाचं भलं कर . आईची आई
म्हणून बाळा कधी वागलास का ? तिचा खडबडीत हात घेऊन एकदा बघ ना.
कितीही कर्तुत्व गाजवा आपली झेप कमी पडते .आईने कडेवर घेतल्यावरच आपली
उंची वाढते. उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा मारता आईच्या पोटी
जन्माला येता आणि देव कुठे म्हणता .आईला सतत मुलांचा ध्यास त्यांचा भास
आणि त्यांच्या प्रेमाची धुंदी. नको कुणाची स्पर्धा. नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं
का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा.

Related Posts

न्याय हा परमेश्वराचा

Pradeep Bachhav
Shareपवार कल्याणी शांतीलाल (ग्रंथपाल )निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव निस्वार्थपणे केलेली जनतेची सेवा भविष्याचा वेध घेऊन शिक्षणाला...
Read More

“क्रौंचवध”

Pradeep Bachhav
Shareवि. स. खांडेकर (विष्णू सखाराम खांडेकर) मराठी साहित्याचे एक अजरामर नाव आहे. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८९८ रोजी सांगली जिल्ह्यातील...
Read More