नावः पशिक काशिनाथ पाईकराव
वर्ग:-TYBCA(SCI)
पुस्तकाचे नावः फकिरा
पुस्तकाचे लेखकः अण्णाभाऊ साठे
फकिरा हि कादंबरी अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाचे सर्वोत्तम उदाहरण वा त्यांची स्वातंत्र्य लढ्याची वृत्ती चे प्रतिबिंब दाखवणाऱ्या लेखणीचा भाग आहे.
हि कादंबरी फकिरा नावाच्या दलीत युवकाच्या आयुष्यातील अडचणी आणि त्याची जिद्द त्याचे धैर्य यांची आहे. फकिरा दलीत जरी असला तरी जो अन्यायाला झुकत नाही आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करतो. फकिरा हे पात्र फक्त एका व्यक्तीचे प्रतिबिंब नसून, शोषित वर्गाच्या वेदनांचे आणि त्यांच्या उठावाचे प्रतीक आहे.
कथेतील पात्र तेव्हाच्या तत्कालीन परिस्थितीची जाणीव करून देतात फाकिराचे कुटुंब त्याविरुद्ध ची लढाई दाखवीत असतात. कथेतली पात्रे त्याकाळचे विविध धर्म जात त्यांतील संघर्ष, दलितांवरील अन्याय त्यांचे लढे जे परप्रांतीय सोबत नसून देशातील च नीच मानसिक वृत्ती सोबत आहे
फकिरा हा नायक केवळ दलितांचा प्रतिनिधी नाही, तर संपूर्ण समाजातील शोषित, गरीब आणि वंचित वर्गाचा आवाज आहे.
कादंबरीत देशभक्तीची भावना वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. इथे देशभक्तीचा अर्थ फक्त परकीय सत्ता विरुध्द लढण्यापुरता मर्यादित नाही, तर देशातील जातीय विषमता, शोषण आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याला जोडलेला आहे. फकिरा समाजाला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय मिळवून देण्याचा ध्यास घेतो. त्याचा संघर्ष केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण समाजासाठी आहे, त्यामुळे त्याची देशभक्ती ही अधिक मोठी आणि अर्थपूर्ण ठरते.
ही कादंबरी आजही समाजासाठी महत्त्वाची आहे कारण ती सामाजिक विषमतेचे आणि त्यातील तत्वांचे दर्शन घडवते. जातीयवाद, शोषण आणि असमानता ही आजही समाजात अस्तित्वात आहेत, आणि फकिराचा संघर्ष त्याविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतो. फकिरा ही केवळ एका युगापुरती मर्यादित कथा नाही, तर ती मानवतेच्या सार्वत्रिक हक्कांसाठी लढण्याचा संदेश देते. अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या लेखणीतून एका शोषित वर्गाचा आवाज जगापर्यंत पोहोचवला, जो आजही तितकाच सजीव आणि प्रभावी आहे आणि त्या घटकांना लढण्याचे आव्हान करतो जे स्वतः साठी लढू बघतात ज्यांना अन्याय फोडून काढायचाय..