Share

श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींचे सुंदर आणि सुरस असून त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. माते बद्दल असणारे प्रेम, भक्ती, आदर व कृतज्ञता या भावना साने गुरुजींनी या पुस्तकात मांडलेल्या आहेत. साने गुरुजींनी हे पुस्तक लिहून त्यांच्या आईला जगप्रसिद्ध केले आहे. प्र के आत्रे म्हणाले कि श्यामची आई हे पुस्तक मातृ प्रेमाची महन्मंगल स्त्रोत्र आहेत. आई बद्दल जगात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण झाले आहे. पण अजूनही घरोघरी ज्या पुस्तकाचे वाचन व्हावे असे वाटते ते म्हणजे शामची आई. शामच्या आईने श्यामवर बालपणी अनेक संस्कार केले. हे संस्कार दैनंदिन जीवनात चालता बोलता येणाऱ्या प्रसंगातून केले आहे. एका कवीने म्हटले कि “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे” साने गुरुजी व त्यांच्या आई मध्ये घडलेले सरळ सोपे संस्कार संवाद आहेत पण त्या संवादामध्ये जीवनाचे मोल सार रूपाने सांगितले आहेत.
श्यामची आई या पुस्तकावर सारांश रूपाने चिंतन केल्यास लक्षात येते कि, श्यामची आई हे साने गुरुजींनी आपल्या आईविषयी भावना, प्रेम, आदर या पुस्तकातून सांगितल्या आहेत. साने गुरुजीना घडविण्यात सर्वात मोठा वाटा त्यांच्या आईचा होता.
थोर अश्रू या कथेमध्ये श्यामच्या आईने श्यामला सांगितले कि, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. असे संस्कार त्यांनी आपल्या मुलाला दिले.
Bhoye Anjali Subhash (MVP Samaj Adv Vitthalrao Ganpatrao Hande College of Education Nashik)

Related Posts

अस्वस्थ नायक

Sanjay Aher
Shareसुशिक्षित बेकाराच आयुष्य वाट्याला आलेल्या अनेकांनी जगण्यासाठी चालविलेल्या लढाईची व त्यांच्या मनातील अस्वस्थता यांची हि कहाणी आहे. अस्वस्थता हा माणसाचा...
Read More

सवळा

Sanjay Aher
Share समकालीन मराठी कादंबरी समाजाच्या सर्वस्तरीय जीवनाला उजेडात आणणारी आणि नानाविध समाजघटकांच्या विविधांगी प्रश्न-समस्यांना मुखर करणारी आहे. विशेषतः बदलत्या ग्रामसंस्कृतीचे,...
Read More