Share

नावाप्रमाणेच असलेल्या गोतावळ्यात मी अशी काही गुरफटून गेले की मला, पुस्तकाविणा काही सुचलेच नाही कोल्हापुरी लहजा गावराण भाषा याचा संगम इंग्रजी खते, ट्रॅक्टर, आधुनिक शेती यावर विश्वास असलेला लिक तर गुरे, वासरे यांनांच कुटुंब मानणारा सरकती नारायण (नाऱ्या). मालकाचा एक विश्वासू सेवक ही कथा आहे त्याचीच. आधुनिकतेवर विश्वास ठेवून ढोरांना विकायला काढणारा मालक त्याचा द्वाड मुलगा “इक्कास” रागीट मालकीण आणि घ्या सगळ्यात गुरफटून जीवाची घाल मेल झालेला ‘नारब। !
“नारबा” नावाप्रमाणेच निखळ मनाचा, भोळा, शांत असा भाव वडील लहान असतानाच वडील वारले त्या दुखात. आई ही कालांतराणे गेली नारबा एकटाच पडला व मालकाकडे कामाला लागला एकट राहण त्याचा मूळ स्वभाव नाही मात्र पारिस्थिती समोर हतबल मालकाकडे आल्यानंतर ‘नारबा’ ला काही जीवनसाथीच मिळाले समजा. म्हातारा निरूपयोगी पण प्रेमळ बैल म्हात्रिंग्या, नामा कुत्रा, सोण्या व चण्णा बैलजोडी आणि एक आंधळा घोडा. ह्या सगळ्यांवर तो जीवापाड प्रेम करू लागला. आणी प्राण्यांनाही ‘नारबा’ ची सवय झालती. सित्या आणि गंग्या त्याचे जीवाभावाचे मैतर पण दोघांनाही बिऱ्हाड असल्यामुळे ते काही घटकाच नारबाकडं कामासाठी आयचे. बालाही वाटायच आपलबी लगीनं व्हाव पर मोटा काढण, पीकास्नी गी देण घ्या समदयातनं वेळ मीळनं तर नव्ह.
जनवार ईकायचीच म्हणून त्यांच्यावर ताव खावून असणारा मालक. आणं जनवारं म्हणजे आपला जीव त्यास्नी कसं वीकायच अस म्हणणारा नारबा. पण मालक ऐकतुय व्ह्यय नारबाच्या डोळ्यादेखत एक-एक जनवार कमी हुत चालल व्हतं. पण बोलण्याची सुदिक मुभा न्हाय काळीज पिळवटुन निघायच, डोळ ओल व्हायचं, उर भरून यायचा पण काय कामाचं न्हाय मालकाला ‘समजतयं व्ह्यय शेवट नारबालाचं येगळी वाट धरावी लागली.
अशी काही ही उत्कृ‌ष्ट कादंबरी. या आधीही मी काही कादंबऱ्या वाचल्या. पण या कादंबरी प्रमाणे वैविध्यपूर्ण अनेक वैशिष्टय असणारी कादंबरी गावराण लहजा, प्राणिजगत असणारी मी पहिल्यांदाच वाचली. प्राणी, पक्षी, माणसे यांचा सहज सुंदर मेळ लेखकानी रेखाटला ते वाचताना क्षणभर आपणही त्यांचाच एक भाग आहोत असे सतत भासते. प्रत्येक पानांत असलेले सुंदर आकर्षक असे शेतीजीवन, जंगल (रान) मनाच्या कानाकोपऱ्यात गेलेल्या नारबाच्या व्यथा त्यावर मलम म्हणून दाटलेली सहानुभूती. या सगळ्यातून शेताच्या अवती भवती असलेल्या प्राणिसृष्टीच चित्रमय रितीन जिवंत आलेखन असाव अशी आशा होतीच आणि ती आशा खरी ठरली. यामधील कितितरी प्राणी, पक्षी आयुष्यातील महत्वाच्या शिकवणी देऊन जातात. मानवी विचारातील वांझपणा लक्षात येतो.
एकीकडे निराधार, एकटा, दुबळा असणारा जीव व दुसरीकडे सेवक आपल ऐकत नाही म्हणून त्याला निरूपयोगी ठरवणारा निष्ठुर, निर्दयी मालक शेतमजुरांच्या व्यथा, समस्या मांडणारी ही कादंबरी जीवनामध्ये एक आगळावेगळा प्रभाव टाकून जाते. एखादया गोष्टीतले बारकावे, सरळता, विशिष्ट देहबोली, लेहजा हे सगळ किती उत्तम असाव हे सगळे शिकाव ते आनंद यादवांनकडूनच एका कथेतील पात्राने सुद्धा आप‌ल्याला भारावून टाकाव त्याविषयी आपुलकी वाटावी माल‌काची भयंकर चीड यावी इतक अप्रतिम लेखन कौतुक करावे तेवढे थोडे आहे शेवटी नारबाचे शब्द मनाला चटका लावून जातात त्याच्या भवीष्याची चिंत आपल्याला जाळते ते म्हणजे “माती होऊन तरी जाईन, कुठ जाणार दुसरी कड”
“I” thought, He is kind way of life he doesn’t find everybody cruel he doesn’t mind because Nature is behind

Recommended Posts

उपरा

Seema Auti
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Seema Auti
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More