भरत आंधळे यांचे गरुड झेप एक ध्येयवेडा प्रवास हे पुस्तक ग्रामीण भागातल्या मुलांना दिशा व प्रेरणा देणारे आहे. गरीब परिस्थितीमुळे अपयशाने मानसिक दृष्ट्या खचलेल्या जीवनात निराशा आलेल्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे. तरुणाईला तसेच संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. पुस्तकातील लेखकाचा संघर्ष आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जाण्याचे बळ देणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढीत लेखकाने यू.पी.एस.सी.च्या परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली हे शिकण्यासारखे आहे. प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गात न बसता प्रयत्न व अथांग परिश्रमाने आपण आपले ध्येय गाठू शकतो हे, या पुस्तकात लेखकाने सत्यात उतरवून दाखवले आहे. आंधळे सरांच्या बाबतीत ‘विद्या विनयेन शोभते’ हे ब्रीदवाक्य तंतोतंत लागू पडते त्यांच्याकडून पुस्तकात अनुभवल्याप्रमाणे खूप ऊर्जा, प्रचंड इच्छाशक्ती,दांडगा आत्मविश्वास आदी गुण घेण्यासारखे आहेत. आयुष्यात कितीही अपयश आले तरी त्या अपयशाला न जुमानता नवीन आशेने पाहण्याची शक्ती हे पुस्तक वाचल्याने निर्माण होते. जीवनात उत्तुंग ध्येय ठेवण्याची प्रेरणा मिळते. व त्या उत्तुंग ध्येयाकडे वाटचाल करताना जीवनातील सर्व भौतिक सुखांना तिलांजली द्यावी लागते, याची परिपूर्ण जाणीव होते. पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतर माझ्या मनात एकच शब्द आला तो म्हणजे ‘अप्रतिम’ कारण हाच एक शब्द योग्य आहे असे मला वाटते. सर्वांसाठी हे पुस्तक एक प्रेरणादायी पुस्तक ठरेल.
Previous Post
COMPUTER ORGANIZATION AND EMBEDDED SYSTEMS Next Post
आमचा बाप आन आम्ही Related Posts
Shareसंगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी – वाळे अपेक्षा...
Share“The book “ The Psychology of Money “ is one of the finest books written by Morgan Housel. It explores...
Shareमन मे है, विश्वास हे पुस्तक माझे आवडते लेखक विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेलं आहे. ते माझे आवडते केव्हा पासून...
