पुस्तकाचे नाव: श्यामची आई : लेखक:- पांडुरंग सदाशिव साने
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे कारागृहात असताना फेब्रुवारी इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ. स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या. आईच्या प्रेममय थोर शिकवणीमुळे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करून व गोड कथात्मक चित्र म्हणजे “श्यामची आई ” असे म्हणता येईल. ‘श्यामची आई ‘ हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरधाम ठरले आहे. माय – लेकरातील व संस्काराच्या हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहे. श्यामच्या बालपणावर जे माणुसकीचे संस्कार त्यांच्या आईकडून झाले आहे त्या घटना या अजरामर कलाकृतीतून कथन केले आहे. साने गुरुजींनी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात अवघ्या पाच रात्रीत ही कादंबरी लिहिले. या कादंबरीच्या तीन लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ. स. १९५३ साली या कादंबरीच्या असलेल्या ‘श्यामची आई ‘ याच नावाचा चित्रपट देखील झळकला आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक केले होते.
साने गुरुजींचे ‘श्यामची आई ‘ ही कादंबरी पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. ‘अमृत महोत्सव’ पूर्ण करणाऱ्या ‘श्यामची आई’ ही कादंबरी मराठी वाचकांना आज 21 व्या शतकातही जीवनाच्या वाटचालीचे ‘श्यामची आई’ व ‘प्रारंभ’ ही प्रकरणे असून नंतर पहिल्या रात्रीपासून ते बेचाळीसाव्या रात्रीपर्यंत प्रकरणे आहेत.
‘श्यामची आई’ या आत्मचरित्रात्मक कादंबरी मध्ये, श्यामच्या आईने त्याच्यावर केलेले संस्कार व त्या संस्कारामुळे श्यामचे घडलेले जीवन याचा प्रत्यक्ष पदोपदी येतो. या कादंबरीमुळे नकळतपणे वाचकाच्या मनावर संस्काराचा ठसा उमटताना दिसतो. श्यामच्या जीवनात मिळालेले संस्कार जीवनात किती परिवर्तन करतात, आणि त्यामुळे जीवन किती सुंदर बनते हे या कादंबरी मधून दिसून येते.
‘श्यामची आई’ या कादंबरीची भाषाशैली अतिशय सोपी आहे सर्व सामान्यांना समजणारी ओघवती अशी आहे. पुस्तकाची किंमत १६० रु. असून ती सर्वसामान्यांना परवडणारी आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक असे आहे. ‘श्यामची आई ‘ तुळशीवृंदावनावर बसलेली आहे. आणि श्याम व त्याचे मित्र आई साठी परडीत फुले देत आहेत. एकूणच मराठी साहित्य विश्वात ही कादंबरी मैलाचा दगड ठरली आहे. म्हणून मला ही कादंबरी खूप आवडली आहे.
नाव :- इंदू देवनाथ खोटरे
प्रथम वर्ष,कला, त्र्यंबकेश्वर